"मी सुंदर आहे मी सर्वोत्तम आहे हेच मनावर ठसवा. सौंदर्य ही फारच वैयक्तिक कल्पना आहे. त्याच्या पलीकडे जाऊन अंतरंगातली सुंदरता जी अधिक महत्त्वाची असते ती ओळखली पाहिजे." श्वेता असोसिएशनच्या २३ व्या वर्धापन दिनी नाट्य चित्रपट अभिनेता अमेय वाघ यांनी हा संदेश उपस्थितांना दिला. "मनातील न्यूनगंड काढून टाका, तरच आयुष्यात पुढे जाता येते. नकारात्मक राहू नका. कॉन्फिडंट रहा, तुमचा आत्मविश्वासच तुमच्या बद्दलचे मत चांगले बनवेल, दिसणे नाही. त्यांचा एक साधा स्ट्रगल करणारा युवक ते यशस्वी अभिनेता हा प्रवासही त्यांनी मुलाखतीत उलगडून सांगितला. काही भलेभुरे अनुभवही बरेच शिकवून जातात, त्यांची खंत न बाळगता पुढे जाणे महत्त्वाचे असते. थोडे बिनधास्त असणे आणि नकारात्मक विचारांना आपल्यावर ताबा न मिळवून देणे आयुष्यात महत्त्वाचे असते. अभिनय हा माझा छंद असून तो छंदच प्रोफेशन म्हणून निवडला असल्याने भरपूर आनंद आणि समाधान मिळते. ठराविक साच्याच्या भूमिका न करता त्यात विविधता असली पाहिजे तरच अभिनेता म्हणून मान्यता देखील मिळते असे त्यांनी आवर्जून सांगितले. माझ्यासमोर बसलेल्या श्वेता असोसिएशनच्या सभासदांनी जीवनात खूप सोसले आहे. लढा दिला आहे. त्यांच्याकडून शिकण्यासाठीच व ऊर्जा घेण्यासाठी मी येथे आलो आहे." असे ते म्हणाले.
डॉ मुक्ता तुळपुळे दाणी यांनी त्यांची प्रगट मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. श्वेता असोसिएशन च्या अध्यक्ष डॉ माया तुळपुळे यांनी संस्थेची माहिती देऊन आंतरराष्ट्रीय सहभागाचा आढावा घेतला तसेच कोडाला नॉन कम्युनिकेबल डिसीझ कॅटेगरीत समाविष्ट करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आणि या चळवळीला सर्वाचा पाठिंबा पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी कर्वे यांनी केले.मानिनी गुर्जर यांनी स्वागत गीत सादर केले.श्रीकांत चाफळकर यांनी आभार प्रदर्शन केले. सभेनंतर वधुवर मेळावा उत्साहात संपन्न झाला. सुमारे ४५ वधुवरांनी उपस्थिती लावली.
Click on the image below to read the article published in Maharashtra Times, July 2020
The Independent - Barbie manufacturer launches new dolls with no hair and vitiligo
State government's new order stated that henceforth the use of Marathi word, 'shwetakushtha', will be banned in all types of communications. Instead, it will be called 'shweta twacha' (white spots/skin).
Read letter from Government of Maharashtra (PDF 37KB)
Click the links to view PDFs
Here are some links to the sites of our well-wishers, collaborators and some useful information on vitiligo.